Ladaki Bahin Yojana KYC Process Update 2026: महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक महिलांचे हप्ते ई-केवायसीमधील तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते. आता मात्र, सरकारने या सर्व प्रलंबित रकमेचा एकत्रित लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, पात्र महिलांच्या खात्यात ६,००० रुपयांपर्यंतची रक्कम जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
योजनेंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्यात येतात. ज्या महिलांचे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते विविध तांत्रिक कारणांनी थांबले होते, त्यांना आता ही रक्कम एकत्रितपणे मिळणार आहे. यामध्ये मागील तीन महिन्यांचे ४,५०० रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचे १,५०० रुपये असे एकूण ६,००० रुपये खात्यात जमा केले जातील. मात्र, हा लाभ केवळ अशा महिलांनाच मिळेल, ज्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
शासकीय पातळीवर झालेल्या पडताळणीत असे दिसून आले की, अनेक अर्जांमध्ये किरकोळ पण महत्त्वाच्या चुका होत्या:
- अर्ज भरताना चुकीचा व्यवसाय पर्याय (उदा. सरकारी नोकरी) निवडणे.
- बँक खाते आधार कार्डशी लिंक नसणे (आधार सीडिंग अपूर्ण).
- नाव किंवा IFSC कोड यांसारखी माहिती चुकीची असणे.
या चुका आता सोप्या पद्धतीने दुरुस्त करता येऊ शकतात. ‘नारीशक्ती’ ॲप किंवा योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांना ऑनलाइन प्रक्रिया जमत नसेल, त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविका किंवा नारीशक्ती दूत यांच्याशी संपर्क साधावा.
प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पात्र महिलांच्या खात्यात ही रक्कम २० फेब्रुवारी २०२६ नंतर टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे महिलांनी आपली ई-केवायसी स्थिती आणि बँक माहिती आताच तपासून घ्यावी.
ही योजना महिलांच्या आर्थक सक्षमीकरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. एकत्रित ६,००० रुपये मिळणे म्हणजे अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरू शकतो. त्यामुळे जर तुमचे हप्ते थांबले असतील, तर वेळेत आवश्यक ती दुरुस्ती करून या संधीचा नक्की लाभ घ्या. अधिक माहितीसाठी ‘नारीशक्ती’ ॲप किंवा अधिकृत पोर्टल नियमित पहा.