Mofat Pithachi Girni Yojana 2026: महाराष्ट्र शासन नेहमीच सर्वसामान्यांचा विचार करत असते, त्यामुळेच या वेळेस महाराष्ट्र शासनाने राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या गोरगरीब महिलांना स्वावलंबी, व आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवण्याकरिता खूप साऱ्या प्रकारच्या योजना सुरू केले आहेत आणि त्यातच एक योजना जी खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना.
या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू महिलांना घरातील पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी भरपूर प्रमाणात अनुदान दिले जाते जेणेकरून या गरीब महिला घरबसल्या आपला छोटासा व्यवसाय सुरू करून कुटुंबाला हातभार लावण्याचे महत्त्वाचे काम करू शकतील.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील भरपूर महिला या कष्ट करण्याची तयारी ठेवतात त्यासोबतच त्यांच्यामध्ये कौशल्य देखील भरपूर असते, परंतु आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्याकारणाने त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकरिता स्वतःचे भांडवल देखील नसते, त्यामुळेच प्रामुख्याने या उद्देशांकरिता ही योजना राबवली जाते.
या योजनेचा उद्देशून हा पुढील प्रमाणे आहे तुम्ही सर्व काही जाणून घेऊ शकता:
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत आणि गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे.
- ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणे त्यासोबतच रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे.
- यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती म्हणजेच एससी व अनुसूचित जमाती एसटी मधील आणि आर्थिक दृष्ट्या मागास महिलांना उत्पन्नाचे साधन मिळवून देणे.
ही पिठाची गिरणी मोफत मिळवण्याकरता सदर महिलाही महाराष्ट्रातील रहिवासी असावी, वयाची मर्यादा किमान 18 ते कमाल साठ वर्षांच्या दरम्यान असावे, उत्पन्न एक पूर्णांक 20 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, अनुसूचित जाती केव्हा जमाती मधील महिला असावी, महिलेचे स्वतःचे बँक खाते असावे.
मोफत पिठाची गिरणी मिळवण्याकरता लागणारी कागदपत्रे आधार कार्ड, रहिवासी दाखला, तहसीलदार उत्पन्न दाखला, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बँक पासबुक, दोन पासपोर्ट साईज फोटो, आणि गिरणीचे कोटेशन.
अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात भेट द्या. तेथून तुम्ही पिठाची गिरणी मोफत योजना 2026 चा विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करा. अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती व्यवस्थित भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.
निष्कर्ष: भरलेला अर्ज संबंधित विभागाकडे जमा करा यानंतर ग्रामसेवक किंवा समाज कल्याण अधिकारी हे अर्जाची पडताळणी करतील, त्यानंतर तुम्ही पात्र आढळल्यास तुमची निवड लाभार्थी म्हणून केली जाईल आणि गिरणीची सर्व रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा केली जाईल अशा प्रकारे तुम्हाला मोफत गिरणीचा लाभ भेटेल.