Gold and Silver Price Dropped : 2026 हे नवीन वर्ष सुरू होऊन अगदी एक महिना ओलांडला आहे, आणि एवढ्यातच सोन्या-चांदीच्या सराफा दुकानांमध्ये मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. गेल्या खूप दिवसांपासून आकाशाला भिडलेले सोन्याचे भाव आता अचानक कोसळू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावरती हसू उमटलेलं पाहायला मिळत आहे, सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 2025 मध्ये सोन्याने रेकॉर्ड ब्रेक उच्चांक गाठला होता आणि त्या पाठोपाठ आता सोन्यामध्ये झालेली ही मोठी घसरण सर्वसामान्यांना आर्थिक दिलासा देत आहे.
अचानक सोन्याच्या घसरणीमुळे बऱ्याच घडामोडी झाल्याचं पाहायला मिळत आहे, तज्ञांकडून अशा बातम्या समोर येत आहेत की जागतिक बाजारपेठेमध्ये काही महत्त्वाच्या झालेल्या बदलांमुळे सोन्या-चांदीच्या किमतीवर दबाव निर्माण झालेला आहे. चला तर मग आज आपण ताजे ताजे सोन्याचे दर पाहूया.
आज सोन्याचे दर प्रति एक तोळा 18 कॅरेट हे एक लाख 18 हजार रुपये आहे, त्याबरोबर 22 कॅरेट सोन्याचे प्रति तोळा आजचे दर एक लाख 40 हजार रुपये आहे, त्याचबरोबर आजचे 24 कॅरेट सोन्याचे प्रति एक तोळा दर आहे एक लाख 95 हजार रुपये आणि आता चांदी चांदी ही प्रति किलो मध्ये मोजतात ती आहे दोन लाख 33 हजार रुपये प्रति किलो.
सर्व बाजारांमधील सर्व तज्ञांच्या अनुसार, फेब्रुवारी 2020 महिना सोन्या-चांदीसाठी घसरणीचा ठरत आहे. जर का जागतिक स्तरावर ती हेच स्थिती कायम पाहायला मिळाली तर, आगामी काळामध्ये सोन्याची भाव स्थिर राहतील किंवा त्यामध्ये आणखी घसरण आपल्याला पाहायला भेटू शकणार आहेत.
घरगुती कार्यक्रम लग्नसराई किंवा बारशासाठी सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांकरिता ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे त्यामुळे जे कोणी ग्राहक सोन्यामध्ये निवेश करण्यासाठी किंवा स्वतःसाठी सोने खरेदी करणार असतील तर ही सुवर्णसंधी सोडू नका.
निष्कर्ष : तुम्हाला वरील जी माहिती दिलेली आहे, ती बाजारातील चालू घडामोडींवरती आधारित आहे. सोन्याचे दर हे प्रत्येक तासाला बदलत असतात याच सोबत त्यावरती मेकिंग चार्जेस सुद्धा प्रत्येक शहरानुसार बदलत असते. त्यामुळे जर का तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर प्रत्यक्ष सराफा दुकानात जाऊन दराची खात्री करावी